देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह; महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा

March 7, 2016 8:49 AM0 commentsViews:

Shivratri2112

07 मार्च : देशभरात महाशिवरात्रीचा उत्साह दिसून येत आहे. महादेवाच्या दर्शनासाठी ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये भाविकांच्या रांगा लागल्या आहेत.

वाराणसी इथलं काशी विश्वेश्वर म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी सर्वात महत्त्वाचं ज्योतिर्लिंग. इथे बाराही महिनेभाविकांची गर्दी असते. पण आज महाशिवरात्रीच्या निमित्ते इथे भाविकांची नेहमीपेक्षा जास्त गर्दी आहे. वाराणसी गंगाघाटावर महाशिवरात्रीनिमित्त पहाटे करण्यात आरती करण्यात आली.

देशभरात शिवमंदिरांमध्ये आणि महत्त्वाच्या शिवस्थानांमध्ये शिवभक्तांची रिघ पाहायला मिळतेय. पहाटेपासूनच महादेवांच्या दर्शनासाठी भक्त आलेत. त्याचबरोबर, राज्यातील भिमाशंकर, रामलिंग, हरिहरेश्ववर, त्रंबकेश्वर, घृष्णेश्वर, कल्याणेश्वर या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. दरम्यान, देशभरात महाशिवरात्र मोठ्या उत्साहाने साजरी केला जात असून भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छाचा वर्षाव भाविकांवर पडत असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुभेच्छा दिल्या. प्रत्येकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा, अशा शब्दात मोदींनी ट्विट केलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close