लातूरमध्ये पाणीटंचाईनं घेतला मायलेकींच्या बळी

March 7, 2016 4:32 PM0 commentsViews:

droughtलातूर -07 मार्च : मराठवाड्यात दिवसेंदिवस दुष्काळाची परिस्थिती रौद्ररुपधारण करत आहे. लातूरमध्ये पाण्यासाठी रात्रभर रांगेत उभं राहिल्यामुळे एका महिलेला ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू झाला. या महिलेच्या मृत्यूच्या धक्क्याने त्यांच्या आईचाही मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडलीये.

शहरातील इंदिरा नगर भागातल्या लताबाई टेकाळे पाणी भरण्यासाठी रविवारी भल्या पहाटे 3 वाजेपासून रांगेत उभ्या होत्या. मनपाच्या बोअरचे पाणी मिळावे यासाठी त्या रांगेत उभ्या होत्या. त्या पाण्याच्या रांगेत असताना सकाळी साडे सहा वाजता त्याना त्रास झाल्याने दवाखान्यात नेण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्याच्या मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सागितलं. लताबाईंचं वय होतं 55 वर्षं. त्यांच्या निधनाची बातमी कळताच लताबाईंची आई गवळनबाई कांबळे या आपल्या मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी लातुरात आल्या. या आईचं वय होतं 80 वर्षं.. रात्री उशिरा त्यांनादेखील छातीत त्रास सुरू झाला. आणि त्यांनाही ह्रदयविकाराचा झटका आला. त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला. या अगोदरही उमेश गायकवाड या तरुणास पाण्याचा वाद सोडवताना आपला प्राण गमवावा लागला होता. आता पाण्यासाठी लातूर शहरातील हा दुसरा बळी आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close