…दादा भविष्यात एकत्र आलो तर राज्यात गंमत करू, महायुतीचे नेते राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर

March 7, 2016 8:22 PM0 commentsViews:

पुणे – 07 मार्च : भाजपचे नाराज मित्रपक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात भाग घेत आपल्या मनातली सल बोलून दाखवलीय. पुण्यात एकाच व्यासपीठावर महायुतीचे नेते सदाभाऊ खोत,महादेव जानकर, विनायक मेटे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, रामराजे निंबाळकर उपस्थित होते. या सर्वांनी राजकीय मतभेद विसरून तुफान टोलेबाजी केली. भविष्यात, दादा आपण जवळ आलो तर राज्यात गम्मत करू असा टोला लगावत विनायक मेटे यांनी आपली नाराजी जाहीर केली. तर सत्तेत असूनही विरोधकांप्रमाणे आंदोलन करण्याची वेळ आल्याचं सदाभाऊ खोत म्हणाले.mahauti_nete3

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस उमेश पाटील यांनी मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदतीच्या कार्यक्रम आयोजित केला होता. पुण्यातील टिळक स्मारकच्या व्यासपीठावर महायुतीच्या घटक पक्षाचे नेते सदाभाऊ खोत,महादेव जानकर,विनायक मेटे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार, रामराजे निंबाळकर उपस्थित होते. मग काय राजकीय मतभेद विसरून सर्वांनीच आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

आम्ही गेले वर्षभर सत्तेत आहोत पण विरोधकाप्रमाणे आंदोलनं करतोय आणि अजितदादा विरोधात असून सत्तेत आहेत अशी कोटी सदाभाऊ खोत यांनी केली.

तर महादेव जानकर यांनी काँग्रेस आणि भाजप यांच्यात फरक नाही एकतर शिवसेनेला सत्ता द्या नाहीतर भविष्यात दादा आपण जवळ आलो तर राज्यात गम्मत करू असा षटकारच ठोकला.

विनायक मेटे यांनी राज्याचं व्हिजन असलेला नेता म्हणजे अजित पवार आणि दादांच्या मनाप्रमाणे राष्ट्रवादी चालला तर पक्ष चालेल असं दादांना खुश करत रामराजेंना चिमटा काढला.

यावर रामराजेंनीही मेटे यांना चांगलाच चिमट काढला. मेटे यांना पाणबुडी देऊन त्यावर लाल दिवा लावा कारण अरबी समुद्रात महाराजांच्या बेटावर पुतळा उभा करायचा आहे तिथं जाता येईल असा टोलाच लगावला. अजित पवार मात्र आपलं होत असलेलं कौतुक आणि नेत्यांची जुगलबंदी एंजॉय करताना दिसले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close