मनसेच्या 11 कार्यकर्त्यांना अटक

March 15, 2010 9:42 AM0 commentsViews: 3

15 मार्चखंडणी मागण्याच्या आरोपाखाली मनसेच्या 11 कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यकर्त्यांनी रितेश सिधवानी या सिनेमा निर्मात्याकडून 25 लाखाची खंडणी मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. सिधवानी यांच्या क्रुकेड या सिनेमाचे मुंबईतील मेहबूब स्टुडिओत शूटींग सुरू होते. यावेळी तिथे जाऊन या कार्यकर्त्यांनी 25 लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार सिधवानींनी केली. या सिनेमात काही विदेशी कलाकार काम करतात. त्यांच्याकडे इथे काम करण्याचा परवाना आहे का, अशी विचारणा करून या कार्यकर्त्यांनी खंडणी मागितल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मनसे सिनेवर्कर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे. विना परवाना परदेशी कलाकार या सिनेमात काम करत असल्याचा आरोप खोपकर यांनी केला आहे. मनसेही तक्रार करणारतर या निर्मात्याविरुद्ध आता उलट तक्रार करणार असल्याचे मनसेने जाहीर केले आहे. मनसे सिनेवर्कर्स असोसिएशन ही तक्रार करणार असल्याची माहिती मनसे महिला आघाडीच्या उपाध्यक्ष शालिनीताई ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अमेय खोपकर त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळण्यात आले. उलट मेहेबूब स्टुडिओमध्ये काम करणार्‍या 130 परदेशी कलाकारांकडे कायदेशीर वर्क परमिट नव्हते. रशिया, अफगाणिस्तान आणि इराण मधून हे कलाकार आणण्यात आले होते. पण बांद्रा पोलिसांचीही त्यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. यामुळे देशाच्या सुरक्षेलाही धोका पोचू शकतो, असेही खोपकर म्हणाले.

close