काँग्रेसचे नेते आले नारायण राणेंसाठी धावून, उद्या अशोक चव्हाण कोकणात !

March 7, 2016 8:48 PM0 commentsViews:

rane_And_chavanदिनेश केळुसकर, सिंधुदुर्ग -07 मार्च : वाळू वाहतूकदारांच्या संपावरून सिंधुदुर्गातलं राजकीय वातावरण तापलंय. या आंदोलनात उतरलेले काँग्रेसचे नेते नारायण राणे हे पक्षात एकाकी असल्याचं चित्र आहे. पण काँग्रेसचे नेते आता राणेंच्या पाठिशी असल्याचं दाखवत आहेत. विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटलांनंतर आता प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही मंगळवारी कोकणात जाणार आहेत.

सिंधुदुर्गात सुरू असलेल्या वाळू वाहतूकदारांच्या आंदोलनात राजकीय फूट पडलीय. आंदोलनाला पाठिंबा देणार्‍या शिवसेना भाजपनं हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. दुसरीकडे काँग्रेसनं मात्र मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं जाहीर केलंय.

पण या आंदोलनात काँग्रेसमध्ये नारायण राणे सुरुवातीला एकाकी पडल्याचं चित्र दिसून आलं. काँग्रेसनं मात्र त्याचं खंडन करत राणे एकाकी नसल्याचं स्पष्ट केलं. आणि त्यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सिंधुदुर्ग गाठलं.

वाळू वाहतूकदारांच्या प्रश्नावरून एकीकडे राजकारण सुरू असताना, डंपरचालकांनी मात्र हे आंदोलन राजकीय पक्षांच्या पाठिंब्यावर नसल्याचा दावा केलाय आणि राजकीय कार्यकर्त्यांनी आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होऊ नये, अशी भूमिका घेतली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close