बसपा झाली 25 वर्षांची

March 15, 2010 10:14 AM0 commentsViews: 1

15 मार्च बहुजन समाज पार्टीला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त आज लखनौमध्ये जोरदार सेलिब्रेशन होत आहे. लखनौमध्ये राष्ट्रीय महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पण या सेलिब्रेशनवर विरोधाकांनी आक्षेप घेतला आहे. पक्षाच्या कामासाठी राज्य प्रशासनाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. केंद्राकडून मिळालेला निधी आणि राज्य सरकारच्या तिजोरीतील 200 कोटींपेक्षा जास्त निधी मायावतींच्या या रॅलीवर खर्च होत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. या रॅलीच्या वेळी मायावतींना चक्क 1 हजारांच्या नोटांचा भलामोठा हार घालण्यात आला.

close