सातार्‍यात 8 वर्षांच्या मुलीची हत्या करून बलात्कार

March 8, 2016 12:25 PM0 commentsViews:

±ú†Öê¸êüָ̯ü¯Ö

सातारा – 08 मार्च : एका आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार सातारा शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. भरवस्तीत हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडली आहे.

कोमल चिकणे, असं हत्या झालेल्या चिमुरडीचं नाव आहे. नंदनवन कॉलनीतील अन्सारी बंगल्याजवळ ती राहत होती. सोमवारी सायंकाळी घरासमोरून ती अचानक बेपत्ता झाली. त्यानंतर बंगल्याच्या पाण्याच्या टाकीत तिचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. पण प्राथमिक अंदाजानुसार, त्याने आधी तिची हत्या केली आणि नंतर तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close