महिला दिन विशेष : ‘ती’च्या जगण्यातला संघर्ष…

March 8, 2016 1:20 PM0 commentsViews:

स्वाती लोखंडे-ढोके, मुंबई -08 मार्च : शिक्षण, नोकरीसाठी आजची महिला संघर्ष करत नसली तरी, दररोजच्या जगण्यातला त्यांचा संघर्ष हा वाढतच चालला आहे. बदलत्या जगाबरोबर आणि त्याच्या सामाजिक स्थित्यंतरासोबत ओढाताण झाली तरीही, त्यासाठी मात्र ती नेहमीच तयार असते. बघुयात तिच्या जगण्यातला संघर्ष…

sdaasdas

टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सचंं हे कॅन्टीन… प्रत्येक कॉलेज, शाळेत दिसते तशीच इथंही विद्यार्थ्यांची गर्दी… तिच लगबग, काउंटरवर असणारी तशीच धावपळ… पण इथं काम करणार्‍या महिला ह्या कचरा वेचक महिला आहेत. महिला बचत गटातून अनेकांनी छोटी-मोठी भरारी घेतली. पण आर्थिक अडचणींचा सामना करणार्‍या या महिलांचा संघर्ष मात्र आजही सुरुच आहे.

टिसच्या कॅॅन्टीनमध्ये सराईतपणे वावरणार्‍या या नलिनी वागझरे. दोन वर्षांपूर्वीचं चित्र वेगळं होतं. कचरा वेचून दिवसाला 60 ते 90 रुपये कमवणार्‍या नलिनीबाईंना आता महिन्याचे 6000 रुपये मिळतायत. त्यांचा आर्थिक स्तर उंचावल्यानं, शेजार्‍यांना त्यांच्या विषयीचा दृष्टिकोनही बदलला आहे.

प्रत्येक स्तरावर संघर्षाचं स्वरुप बदलतंय, पण संघर्ष सुरूच आहेच. या नव्या जमान्यात टिकून राहण्यासाठी तिला फिट राहायचंय. शारिरीक आणि मानसिकही कधी कुणी बँकर, तर कधी अगदी प्रोफेसरही योगाचे धडे गिरवतायत, ही तिची गरज आहे आणि योगा शिकवणार्‍या महिलांना रोजगार आणि शिकणार्‍यांना समाधान असं यातून साध्य होतंय.

पूर्वीच्या काळात मासिक पाळीच्या वेळी तिचं घराबाहेर वावरणंही मर्यादित असायचं, पण त्याही मर्यादा आता संपल्या आहेत. आधी सॅनिटरी नॅपकीन, मग टॅम्पॉन्स आणि आता बाजारात आलेलं मेन्स्ट्र्युल कप.

स्त्री-पुरुष समानतेच्या आजच्या युगात, पुरुषाच्याबरोबरीनं ती कमावत असेल तरीही, कुटुंबातली बहुतांश कामं तिलाच उरकावी लागतात. एवढंच नाही तर नवर्‍यापासून ते कुटुंबात असलेल्या प्रत्येकाची जबाबदारी तिलाच सांभाळावी लागते. एवढ्या सगळ्या जबाबदार्‍या पार पाडत असताना, तिला जो संघर्ष करावा लागतो त्याची तिला भीती वाटत नाही. म्हणूनच तिला आयबीएन लोकमतचा सलाम….


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close