बोगस विद्यार्थी ताब्यात

March 15, 2010 10:42 AM0 commentsViews: 2

15 मार्च सोलापूरमध्ये दहावीच्या परीक्षेत बसलेल्या बोगस विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुप्रिया गरड या विद्यार्थिनीच्या जागेवर फोटो बदलून अमोल सप्रे नावाचा विद्यार्थी परीक्षेला बसला होता. पोलिसांनी या बोगस विद्यार्थ्याला ताब्यात घेतले. त्याच्यावर फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सखूबाई हिराचंद नेमचंद या परीक्षा केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला. काही दिवसापूर्वीच सोलापूरमध्ये सामूहिक कॉपीचा प्रकार उघडकीस आला होता. त्याप्रकरणी 42 शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

close