सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

March 8, 2016 4:49 PM0 commentsViews:

vikhe_pcमुंबई – 09 मार्च : उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. विभान परिषदेच्या सभापतींनी विरोधकांना चहापानाला येण्याची विनंती केली होती. परंतु, विरोधकांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकलाय.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्शवभूमीवर आज (मंगळवारी) विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. दुश्काऴग्रस्त शेतकर्‍यांसाठी सरकार काहीच करत नाही, अशी टिकेची झोड विरोधी पक्षांनी उठवलीय. मुख्यमंत्र्यांसह कॅबिनेट मंत्र्यांनी मराठवाड्याचा केलेला दौरा म्हणजे फार्स होता, असं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं. त्याचबरोबर शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. सरकार दुष्काळ दाबण्याचा प्रयत्न करतंय, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close