विजय मल्ल्यांना भारताबाहेर जाऊ देऊ नका, याचिका दाखल

March 8, 2016 5:05 PM0 commentsViews:

vijay mallayनवी दिल्ली – 08 मार्च : किंगफिशर समुहाचे सर्वेसर्वा विजय मल्ल्या यांच्या परदेशी जाण्याविरोधात बँकांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या बुधवारी सुनावणी होणार आहे. शिवाय विजय मल्ल्या यांच्यावर आता अंमलबजावणी संचालनालयानंही फास आवळायला सुरुवात केलीय.

गेल्या आठवड्यात ईडीनं मल्ल्यांविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला आहे. जुलै 2015 मध्ये सीबीआयने मल्ल्यांविरोधात एफआयआर दाखल केली होती. त्याआधारावर ईडीनं ही कारवाई केली आहे. आयडीबीआयकडून मिळालेलं कर्ज हे मल्ल्यांनी इतर कर्ज फेडण्यात वापरलं आणि त्यातली काही रक्कम विदेशात नेऊन ठेवली, असा त्यांच्यावर आरोप आहे.

दरम्यान, मल्ल्यांना कर्ज वसुली लवादाच्या रुपानं आणखी एक दणका मिळालाय. डायाजियो या दारूच्या मोठ्या कंपनीकडून किंगफिशरला 510 कोटी रुपये मिळणार होते. पण हे पैसे आता डायाजियो किंगफिशरला देऊ शकणार नाहीये. तशी बंदी कर्ज वसुली लवादानं आणली आहे. हे पैसे मल्ल्यांनी कर्ज घेतलेल्या कोणत्यातरी बँकेकडे वळते केले जाऊ शकतात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close