मुख्यमंत्र्यांनी बोलावली महायुतीच्या नेत्यांची बैठक

March 8, 2016 5:38 PM0 commentsViews:

cm_mahayuti_meetमुंबई – 08 मार्च : आम्ही सत्तेत आहोत असं वाटतच नाही, सत्तेत असून आम्हाला विरोधकांप्रमाणे आंदोलनं करावी लागताय अशी जाहीर नाराजी महायुतीच्या नेत्यानंनी तीही राष्ट्रवादीच्या मंचावरून व्यक्त केल्यामुळे महायुतीत चिंतेचं वातावरण पसरलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने महायुतीच्या सर्व नेत्यांनी बैठक बोलावली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व्यापीठावर सत्ताधारी घटक पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या सर्व घटक पक्षांची तातडीने बैठक बोलावली आहे. आज रात्री ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष , शिवसंग्राम आणि रिपाई आठवले गटाचे नेते उपस्थित राहणार आहेत . उद्या पासून सुरू होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात सत्ताधारी पक्षाची रणनीती देखील ठरणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळाची नेमणूक या बाबतीत सहयोगी पक्ष या बैठकीत काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close