गुढीपाडव्यासाठी बाजारपेठ सजली

March 15, 2010 10:57 AM0 commentsViews: 6

15 मार्च उद्या गुढीपाडवा. साडेतीन मुहुर्तांपैकी एक. मराठी नववर्षाची सुरुवात. गुढीपाडव्याला खास मान असतो साखरेच्या गाठ्यांचा अर्थात माळांचा. साखरेचे भाव वाढल्याने या माळांचे भाव 50 टक्क्यांनी वाढले आहेत. गुढीसाठी लागणार्‍या काठ्या, नवीन साड्या, फळे यांनी बाजरपेठा सजल्या आहेत. यावेळी बाजारात छोट्या रेडीमेड गुढ्याही आल्या आहेत. गुढीपाडव्याला सोनेही खरेदी करण्याची परंपरा आहे. त्यामुळे सोन्याचे भाव वाढले असले तरीही ग्राहकांची दुकानातील गर्दीही वाढेल.तसेच नवीन गाड्या, कॉम्प्युटर, इतर घरगुती वस्तू घेण्यासाठीही ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे.

close