छगन भुजबळ हाजीर हो !, ईडीची चौकशीसाठी नोटीस

March 8, 2016 8:25 PM0 commentsViews:

Bhujbal2311मुंबई -08 मार्च : महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यामागे लागलेला ईडीचा फेरा कायम आहे. ईडीने आता छगन भुजबळ यांना नोटीस बजावली आहे. 15 तारखेला चौकशीसाठी हजर राहावं असं या नोटिसीमध्ये बजावण्यात आलंय. त्यामुळे आता समीर भुजबळ आणि पंकज भुजबळांच्या नंतर छगन भुजबळांची चौकशी होणार आहे.

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी अंमलबजावणी संचालयाने भुजबळ कुटुंबाच्या भोवती फास आवळलाय. भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांना सर्वात आधी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर अटक करण्यात आली. समीर भुजबळ सध्या ईडीच्या कोठडीत आहे. त्यांच्यापाठोपाठ पंकज भुजबळ यांचीही चौकशी करण्यात आली. दोघांवरही ईडीने मनी लाँड्रिंगचा ठपका ठेवला आहे. दोघांनीही अनेक खात्यातून पैसे वळवण्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळेच ईडीने समीर भुजबळांना ताब्यात घेतलंय. समीर भुजबळांच्या अटकेनंतर छगन भुजबळ यांचा नंबर हा निश्चित समजला जातोय. भुजबळांनीही आपला बचाव कऱण्यासाठी आपली शक्तीपणाला लावली आहे. आता पुन्हा एकदा ईडीने छगन भुजबळांना चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यांच्या चौकशीतून काय निष्पन्न होतं हे लवकरच कळेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close