आयपीएलमध्ये आज एकच मॅच

March 15, 2010 11:05 AM0 commentsViews: 6

15 मार्चआयपीएलमध्ये आज एकच मॅच रंगणार आहे. शेन वॉर्नच्या राजस्थान रॉयल आणि गौतम गंभीरच्या दिल्ली डेअरडेव्हिल्सदरम्यान होणारी मॅच अहमदाबादमध्ये खेळवली जाईल. आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल विजयी ठरली होती. पण त्यानंतर दुसर्‍या हंगामात त्यांना लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. आणि आता तिसर्‍या हंगामातही त्यांची सुरुवात खराब झाली आहे. मुंबई इंडियन्सविरुध्दची सलामीची मॅच राजस्थान रॉयलला गमवावी लागली होती. दुसरीकडे दिल्ली डेअरडेव्हिल्सनं स्पर्धेत विजयी सलामी दिलीय.पहिल्या मॅचमध्ये त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबचा त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभव केला.

close