मुलगी झाली, त्यांनी हत्तीवरुन साखर वाटली !

March 8, 2016 6:38 PM0 commentsViews:

पुणे – 08 मार्च : मुलगी जन्मल्याच्या आनंद कुणी हत्ती वरून साखर वाटून व्यक्त केला असं कुणी सांगितलं तर आपल्यापैकी अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. पण पिंपरी चिंचवडमध्ये हे घडलंय.

पिंपरी महापालिका हद्दितील ग्रामीण परिसरात राहणार्‍या तापकीर कुटुंबात तब्बलpimpari_news 2 पिढ्यांनंतर ही चिमुकली जन्माला आली. आणि म्हणूनच हा आनंद मोठा गाजा-वाजा करत साजरा करण्याचं ठरलं आणि तिचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी थेट गजराजांना पाचारण करण्यात आलं. गावभर घातलेल्या रांगोळ्याच्या पायघड्यावरून चालणार्‍या या शाही हत्तीवरून मुलीच्या जन्माची वार्ता अभिमानाने सांगत खुद्द पित्याने हा साखर वाटपाचा सोहळा साजरा केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close