यूपी फ्रेट कॉरिडॉर नॅशनल पार्कमधून नेण्याचा प्रस्ताव नाही -जावडेकर

March 8, 2016 10:51 PM0 commentsViews:

prakash javadekarमुंबई – 08 मार्च : प्रस्तावित मुंबई -दिल्ली यूपी फ्रेट कॉरिडॉर राजीव गांधी नॅशनल पार्कमधून नेणार नाही असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकसभेत स्पष्टीकरण दिलं. या प्रस्ताविक प्रकल्पामुळे काही नियमांना तडा जाण्याची शक्यता होती त्याला शिवसेनेनं विरोध केला होता.

मुंबई -दिल्ली कॉरिडॉरसाठी राजीव गांधी नॅशनल पार्कचा विनाश होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. या कॉरिडॉरमुळे नॅशनल पॉर्कचं अस्तित्वचं धोक्यात येईल असा दावा त्यांनी केला होता.

आज लोकसभेत मुंबईचे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यंानी लोकसभेत यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला आणि त्याला जावडकेर यांनी उत्तर दिलं.

हा कॉरिडॉर नॅशनल पार्कमधून नेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला नाही आणि असा कोणताही प्रस्ताव नाही असा खुलासा जावडेकर यांनी केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close