गरिबांच्या घरांसाठी आता महाराष्ट्र निवारा निधी

March 15, 2010 1:21 PM0 commentsViews: 3

15 मार्चगरिबांच्या घरांसाठी राज्य सरकार आता महाराष्ट्र निवारा निधी स्थापन करणार आहे. गरिबांना घरे देताना अनुदान देता यावे यासाठी या निधीचा वापर होणार आहे. या निधीसाठी राज्यसरकार 100 कोटी तर म्हाडा 300 कोटी रुपये देणार आहे. अल्प उत्पन्न गटातील घरांच्या योजना रखडू नयेत यासाठी हा निधी निर्माण केला असल्याची माहिती गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी दिली आहे. एसआरए प्रकल्प राबवताना सरकारला द्यावा लागणार्‍या फीमधील 90 टक्के रक्कम या निधीसाठी मिळणार आहे. तसेच अतिरिक्त एफएसआय उपलब्ध करुन दिल्यानंतर जी रक्कम सरकारला मिळते त्यातील 50 टक्के रक्कम या निधीसाठी रक्कम वापरली जाणार आहे. तसेच टीडीआर विक्रीतून मिळणार्‍या रकमेतील अर्धी रक्कम या निधी देण्यात येणार आहे.

close