विदर्भात 47 नवे थर्मल प्लँट

March 15, 2010 1:27 PM0 commentsViews: 19

15 मार्चमुबलक खनिज संपत्ती मिळणार्‍या विदर्भात राज्यातील सर्वाधिक औष्णिक वीजनिर्मिती होते. राज्य सरकारने याचाच विचार करून विदर्भात 47 नवे थर्मल प्लँट उभे करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. पण याला काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार आणि प्रकाश आंबेडकरांनी कडाडून विरोध दर्शवला आहे. चंद्रपूरच्या कोराडी थर्मल पॉवर प्लँटमध्ये 1080 मेगा वँट वीजेची निर्मिती होते. इथून जवळच खापरखेडा औष्णिक वीज निमिर्ती केंद्रही आहे. आता 47पैकी 39 प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावण्याचा सरकारचा मानस आहे.

close