संशयीत अतिरेक्यांना अटक

March 15, 2010 1:34 PM0 commentsViews: 6

15 मार्चएटीएसच्या अधिकार्‍यांनी संशयावरून अब्दुल लतिफ उर्फ गुड्डू आणि रेहान अली उर्फ सलीम या दोन संशयीत अतिरेक्यांना अटक केली आहे. कांदीवली भागात राहणार्‍या अब्दुल लतिफच्या नातेवाईकांना मात्र ही बाब मान्य नाही. अब्दुलला पोलिसांनी संशयीत अतिरेकी म्हणून अटक केल्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठाच धक्का बसला आहे. अब्दुल लतिफ फ्रीज टीव्हीचे कव्हर बनवण्याचे काम करत आहे. त्याचे कोणत्याही अतिरेकी संघटनाशी संबध नाही, असे त्याच्या पत्नीने म्हटले आहे. अब्दुलला अकारण या प्रकरणात अडकवल्याचा आरोपही तिने केला आहे.

close