राज्यातील 1053 गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर

March 9, 2016 4:40 PM0 commentsViews:

maharshtra_drought_helpमुंबई – 09 मार्च : राज्य सरकारने दुष्काळग्रस्तांना दिलासा दिलाय. महसूल आणि राज्य कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधान परिषदेत निवेदन दिलं. 2015 -16 रब्बी हंगामातील आणेवारी 50 टक्के पेक्षा कमी असणार्‍या या 1053 गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्हयातील 408 गावं, सोलापूर जिल्हयातील 645 गावांचा यात समावेश आहे. यानुसार शेतकर्‍यांना काही सवलती देण्यात आल्यात. कृषी पंपात वीज 33.5 टक्के सूट, विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्क माफी, टँकरने पाणीपुरवठा, शेतकरी कर्जवसुली स्थगिती देण्यात आली. सहकारी पीक कर्ज पुर्नगठन आणि शेतीपंपाची वीज खंडीत न करणे या सवलतींचाही त्यात समावेश आहे.

दुष्काळग्रस्तांना दिलासा

- 2015-16 रब्बी हंगामातील आणेवारी 50 टक्के पेक्षा कमी असणार्‍या एक हजार 53 गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर

- अहमदनगर जिल्ह्यातली 408 गावं
– सोलापूर जिल्ह्यातली 645 गावं

सवलती
– कृषी पंपात वीज 33.5 टक्के सूट
– विद्यार्थी परीक्षा शुल्क माफ
– टँकरने पाणी पुरवठा
– शेतकरी कर्जमाफी स्थगिती
– सहकारी पीक कर्ज पुर्नगठन
– शेती पंपाची वीज खंडीत न करणे


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close