आलात तर तुमच्यासोबत नाही तर एकटे लढू – उद्धव ठाकरे

March 9, 2016 5:04 PM0 commentsViews:

uddhav on khadseसातारा -09 मार्च : आलात तर तुमच्यासोबत नाही तर एकटे लढू, असा थेट इशाराच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला आहे. सातार्‍यात शिवनसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी पुणे महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं.

सातार्‍यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुणे महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. जर मुंबई, कल्याण डोंबिवलीमध्ये एक वॉर्ड एक नगरसेवक आहे तर पुण्यात एक वॉर्ड एक नगरसेवक का नाही ? असा सवालही त्यांनी विचारलाय. प्रभाग पद्धतीला सेनेचा विरोध आहे, असंही उद्धव म्हणाले. तसंच शिवसेना निवडणूक लढवणार आणि जिंकणारही आहे. जर सोबत आलात तर एकत्र निवडणूक लढवून अन्यथा शिवसेना निवडणूक लढवण्यास सक्षम आहे. कारण आमची युतीही पुणेकरांसोबत आहे असा इशाराच उद्धव यांनी भाजपला दिला.

तसंच पठाणकोटचा हल्ला कसा झाला यावर चर्चा झाली पाहिजे. आपल्यालाही कळले पाहिजे की, कुठे कुठे भगदाडं पडली कुठून दहशतवादी भारतात येऊ शकता यावर चर्चा झाली पाहिजे. पण, असं होत नाही. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचं रक्त आटण्याआधी चर्चा राहिली बाजूला पण पाकिस्तान टीमला भारतात कसे बोलावले जाईल याच्यावर भर दिला गेला हे अत्यंत दुदैर्वी आहे अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close