हडपसरला ग्लायडर विमानाचं इमर्जन्सी लँडिंग, पायलट जखमी

March 9, 2016 5:48 PM0 commentsViews:

pune_planपुणे – 09 मार्च : पुण्यात हडपसरला ग्लायडर विमानाचं गाडीतळमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आल्याची घटना घडलीये. या लँडिंगमध्ये पायलट किरकोळ जखमी झालाय. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही.

दोन आसनी या विमानाचं तांत्रिक बिघाडामुळे लँडिंग करण्यात आलंय. ट्रेनिंगसाठी या विमानाचा वापर केला जातो. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हडपसरमधील एका कॅनलवर या विमानाचं लँडिंग करण्यात पायलटला यश आलं. पायलटने  प्रसंगावधान राखत निर्जळस्थळी या विमानाचं लँडिंग केल्यामुळे मोठी दुर्घटना टळलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close