काँग्रेसला बदनाम न होण्याचं वरदान -नरेंद्र मोदी

March 9, 2016 6:39 PM0 commentsViews:

sonia_vs_modiनवी दिल्ली – 09 मार्च : काँग्रेसला बदनाम न होण्याचं जणू वरदान मिळालंय. कारण जेव्हा काँग्रेसवर टीका होते तेव्हा मीडियामध्ये विरोधकांवर टीका अशी हेडलाईन पाहण्यास मिळतात असा चिमट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला काढला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर दिलं. काँग्रेसला जणू बदनाम न होण्याचं वरदान मिळालं. काँग्रेसवर आरोप केले तर विरोधकांवर हल्लाबोल असंच म्हटलं जातं. आम्ही शरद यादव यांच्यावर टीका केली जेडीयूवर हल्ला असं म्हटलं जातं किंवा मायावतींवर टीका केली तर बसपावर हल्ला असं म्हटलं जात पण काँग्रेसला असं कधीच म्हटलं जात नाही. कधीच काँग्रेसची नावाने बदनामी झाली नाही हे एक वरदानच मिळालंय असा टोलाही त्यांनी लगावला. आज अनेक योजना रखडलेल्या आहे. मी स्वत: याची पाहणी केली असता एकूण 300 अशा योजना निदर्शनास आल्यात. ज्याची किंमत 15 लाख कोटी इतकी आहे अशी माहिती मोदींनी दिली. तसंच सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू दिल्याबद्दल विरोधकांचे आभारही मानले. तसंच स्वच्छता अभियान, सत्तेचं विकेंद्रीकरण अशा अनेक मुद्यांवर त्यांनी भर दिला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close