श्री श्रींच्या महोत्सवाला परवानगी आणि 5 कोटींचा दंडही !

March 9, 2016 7:08 PM0 commentsViews:

shri shri_program4नवी दिल्ली – 09 मार्च : श्री श्री रवीशंकर यांचा वादात सापडलेल्या विश्व शांती महोत्सवाला अखेर परवानगी मिळाली आहे. परंतु,
राष्ट्रीय हरित लवादानं पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना 5 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर दिल्ली प्रदूषण बोर्डाने 1 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय.

श्री श्री रवीशंकर यांच्या नवी दिल्लीत होणार्‍या नियोजित कार्यक्रम विश्व शांती महोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. पण, या महोत्सवावरून राज्यसभेत जोरदार गदारोळ झाला. दिल्लीमध्ये यमुना नदीच्या पात्रात आर्ट ऑफ लिव्हिंगचा कार्यक्रम होतोय. 11 मार्चपासून हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी पर्यावरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. त्यावरून राष्ट्रीय हरित लवादानं नोटिसही बजावली आहे.

तसंच कार्यक्रमाच्या ठिकाणी एका पुलाच्या बांधकामासाठी लष्कराला तैनात करण्यात आलं आहे. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. अखेर राष्ट्रीय हरित लवादाने पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवलाय. 5 कोटींचा दंड ठोठावलाय. या आधीही झालेल्या सुनावणीत ऑर्ट ऑफ लिव्हिंगच्या वकिलांनी महोत्सवाच्या ठिकाणी साधनसामुग्रीसाठी 25.63 कोटींची खर्च केलाय. पर्यावरण मंत्रालयाने हरित लवादाकडे या कार्यक्रमासाठी ऑर्ट ऑफ लिव्हिंगला या कार्यक्रमासाठी मंत्रालयाच्या परवानगीची आवश्यकता नाही असं स्पष्ट केलं होतं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close