ऑनलाईन साडेचार कोटींचा गंडा घालणारी टोळी अखेर गजाआड

March 9, 2016 10:37 PM0 commentsViews:

cyber_crime23पुणे – 09 मार्च : कर्ज पाहिजे का ? असं आमिष देऊन महाराष्ट्रातील तब्बल 760 लोकांना 4 कोटी 60 लाखांचा ऑनलाईन गंडा घालणारी टोळी जेरबंद झालीये. पुणे पोलिसांच्या सायबर सेलने या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहे.

दिल्लीत काल सेंटर उघडून महाराष्ट्रात फोन करून गरजू लोकांना कर्जाच्या नावाखाली लुटणार्‍या टोळीला पुणे पोलिसांच्या सायबर सेलने अटक केली आहे. दिल्लीतून कुठल्याही नंबरला फोन करून आपल्याला कर्ज हवंय का ? असे फोन करून लुटलं जात होतं.

प्रोसेसिंग फी म्हणून काही रक्कम आगाऊ दिलेल्या अकाऊंटमध्ये जमा करायला सांगितलं जात होतं. ही रक्कम जमा झाली की आरोपी संबंध तोडतं असे. या टोळीने महाराष्ट्रभरात 760 लोकांना जवळपास 4 कोटी 60लाख रुपयांना गंडा घातल्याच उघड झालंय. याप्रकरणी प्रकारात मनीष गुप्ता, अवनीश सिंग, तरुण गुप्ता या तिघांना दिल्लीतून अटक करण्यात आहे.

या तिघांनी दिल्लीत खोट्या नावाने बँकेत खाती काढून अनेकांना या खात्यांवर लोनच्या प्रोसेसिंगचे पैसे या खात्यावर तत्काळ ते काढून टाकत असत. या ऑनलाईन फसवणुकीने महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्या सगळ्या गुन्ह्यांमध्ये या आरोपीची पहिलीच अटक आहे. फसवणूक झालेले अनेकजण हे पुण्यातले आहेत अशी माहिती ही समोर येतेय. या सगळ्या प्रकारानंतर अशी फसवणूक झालेल्या व्यक्तींनी पुणे पोलिसांच्या सायबर सेल शी संपर्क करण्याच आवाहन पोलिसांनी केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close