पुणे पोलीस आयुक्तांवर गृहराज्यमंत्री नाराज

March 15, 2010 2:23 PM0 commentsViews: 5

15 मार्चपुण्याचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग मला अपमानास्पद वागणूक देत आहेत…माझी पायलट, सिक्युरिटीही त्यांनी काढून घेतली आहे…पुण्यातील बंद पोलीस स्टेशन्स सुरू करण्याच्या सूचनांकडे ते दुर्लक्ष करत आहेत…ही तक्रार कोणाही सामान्य पुणेकराची नाही. तर ती आहे, चक्क गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांची! चंद्रपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही अनेक दिवसांची सल व्यक्त केली आहे. याबद्दल त्यांनी त्यांनी थेट टीका केली आहे, ती पुण्याचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांच्यावर. एवढेच नव्हे तर मी केवळ मागासवर्गीय असल्यानेच आयुक्त मला अशी हीन वागणूक देत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. आता याबाबत आपण पुन्हा मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांकडे लेखी तक्रार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

close