नंदूरबारमध्ये ट्रक-बोलेरोच्या अपघातात 4 ठार,6 जखमी

March 10, 2016 9:26 AM0 commentsViews:

Nandurbar21
नंदूरबार – 10  मार्च : भरधाव बोलेरो आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले.

नंदूरबार जिल्हय़ात अंकलेश्वर-बर्‍हाणपूर महामार्गावर शिर्वे फाट्याजवळ हा अपघात झाला. भरधाव बोलेरो गाडी आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात गाडीतील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जणं जखमी झालेत. जखमींना तातडीने तळोदा इथल्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close