अर्थसंकल्पीय अधिवेशन : दुष्काळाच्या मुद्दावरून विरोधकांची आक्रमक भूमिका

March 10, 2016 8:46 AM0 commentsViews:

vidhan

मुंबई – 10 मार्च : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आजच्या दुसरा दिवशी विरोधक दुष्काळाच्या मुद्दावरून आणखी आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळाच्या पायर्‍यांवर बसून आंदोलन करणार आहे. त्यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची 10 वाजता बैठक होणार आहे. त्यामध्ये सभागृहात आणि सभागृहाबाहेर कोणती भूमिका घ्यायची यावर रणनिती आखली जाईल

त्याशिवाय, डान्सबार, धनगर आरक्षण, आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंचा वाद हे मुद्दे विरोधकांच्या रडारवर आहेत.

डान्सबार बंदीबाबात कायदा करा, दोन्ही सभागृहात सहकार्य करु, असं आवाहन विरोधी पक्षनेत्यांनी केलं आहे. तर काँग्रेसनं आज विनोद तावडे यांच्याविरोधात स्थगन प्रस्ताव आणण्याचं निश्चित केलं आहे. मंत्री झाल्यानंतर तावडे यांच्या निकटवर्तीयांची काही कंपन्यांच्या संचालक मंडळांवर नियुक्ती झाल्याचा आरोप आहे.

याशिवाय प्रश्नोत्तराच्या तासात धनंजय मुंडे धनगर आरक्षणाबाबतच पहिला प्रश्न उपस्थित करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे या बाळासाहेबांच्या स्मारकावरुन लक्षवेधी उपस्थित करण्याचे संकेत आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close