विरोधकांकडून सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

March 10, 2016 11:51 AM0 commentsViews:

मुंबई – 10 मार्च : विधानसभा अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या आज (गुरुवारी) दुसर्‍या दिवशी विरोधकांकडून सरकारचा प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून विरोध करण्यात आला.

विरोधकांनी विधीमंडळाच्या पायर्‍यांवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी विरोधकांनी प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आला. या आंदोलनात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सहभागी झाले होते.

CdKferfWwAAFT3r.jpg large

‘अरे गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला… घोटाळा घोटाळा तूर डाळीचा घोटाळा.. गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला… घोटाळा घोटाळा चिक्कीचा घोटाळा’, ‘राम नाम सत्य है, युती सरकार बडी मस्त है’, अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात येत आहेत.

विधानसभेत मंगळवारी राज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान विरोधकांकडून घोषणाबाजी करण्यात आली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close