भाषणात काहीही प्रक्षोभक आढळल्यास कारवाई करू – राम शिंदे

March 10, 2016 1:00 PM0 commentsViews:

मुंबई – 10 मार्च : कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली, असा इशारा राज्यचे गृहराज्यामंत्री राम शिंदे यांनी दिला आहे. मनसेच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या सभेत राज ठाकरे यांनी काल (गुरूवारी) रिक्षा परवान्यांवरून सुरू असलेल्या गोंधळाबाबत राज्य सरकार आणि परप्रांतींयाना लक्ष्य केलं.

ram shinde

परिवहन विभागातर्फे 70 हजार रिक्षांचे परवाने दिले जाणार आहेत. त्यापैकी 70 ते 72 टक्के परवाने परप्रांतियांना देण्यात आले आहेत. या सर्व रिक्षा उद्योगपती राहुल बजाज यांच्या कंपनीकडून बनवल्या जाणार असून यात 1190 कोटी रुपयांचा व्यवहार होणार असल्याचं कळतं, असा गंभीर आरोप करत राज यांनी या रिक्षा रस्त्यावर आल्यास त्यातील प्रवाशांना खाली उतरवून रिक्षा जाळून टाका, असे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केलं.

त्यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार, हे राज्य कायद्याचे आहे. राज यांचं संपूर्ण भाषण ऐकून त्याची चौकशी केली जाणार आहे. त्यात काही प्रक्षोभक आढळल्यास गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाईल असंही शिंदेंनी म्हटलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close