न्यूक्लिअर विधेयक पुढे ढकलले

March 15, 2010 2:39 PM0 commentsViews:

15 मार्चन्यूक्लिअर लायबिलिटी विधेयक आता पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. विरोधकांचा आक्रमक पवित्रा पाहून सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते. भारत अमेरिका अणुकराराशी संबंधित या विधेयकात अणुअपघातांविषयीच्या तरतुदी आहेत. या विधेयकानुसार अणुप्रकल्पात अपघात झाल्यास त्याची जबाबदारी अमेरिकन कंपन्यांवर नसून भारत सरकारवर असणार आहे. याच मुद्द्यावरून भाजप आणि डाव्यांनी या विधेयकाला विरोध केला आहे. म्हणून केंद्र सरकारने हे विधेयक सध्या न मांडण्याचा निर्णय केला आहे. काँग्रेस पक्षातील काही नेत्यांचाही या विधेयकाला विरोध आहे. एकमत झाल्यानंतरच हे विधेयक मांडण्यात येईल, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले.तर हे विधेयक अचानक मागे का घेतले, याचे स्पष्टीकरण सरकारने सभागृहात दिले पाहिजे अशी मागणी भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली.

close