मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर वाळूवाहतूकदारांचं आंदोलन मागे

March 10, 2016 1:35 PM0 commentsViews:

Sumper Protest

सिंधुदुर्ग – 10 मार्च : मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूवाहतूकदारांचं आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती काँग्रेसे नेते नारायण राणे यांनी आज येथे दिली.

पोलीस आणि महसूल खात्यातील अधिकार्‍यांच्या जाचाला कंटाळून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूवाहतूकदारांनी बेमुदत आंदोलन पुकारलं होतं. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी शेकडो डंपर मुंबई-गोवा महामार्गावर उभे करून वाहतूक ठप्प करण्यात आली. त्यानंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला तसेच या प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्यासह अन्य आंदोलकांना अटक करण्यात आली. त्यावरून जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे. याप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नारायण राणेंनी काल (बुधवारी) रात्रीच मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पोलीस वाळू वाहतूकदारांवर कारवाई करणार नाहीत, असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं नारायण राणे यांनी जाहीर केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close