गुढी पाडव्याची तयारी उत्साहात

March 15, 2010 2:53 PM0 commentsViews: 15

15 मार्चमुंबई आणि उपनगरात गुढी पाडव्याची तयारी जोरात सुरु आहे. या वर्षी मिनी गुढीची मागणी वाढली आहे. लहान रंगीत गुढी बांधुन मुंबईकर गुढीपाडवा साजरा करणार आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यावर ठिकठिकाणी झेंडुची फुले आणि तोरणांचीही विक्री सुरू आहे.फुले, श्रीखंड महागलेदोन दिवसांपूर्वी झेंडुंच्या फुलांचा दर 40 रुपये किलो होता. पाडव्यानिमित्त याचा भाव 80 ते 120 रुपये किलो झाला आहे.गुढीपाडव्याला श्रीखंडाची मागणीही मोठ्या प्रमाणात असते. यावर्षी श्रीखंडाची किंमत 250 रुपये किलोपर्यंत वाढली आहे. दरवर्षी पेक्षा यावर्षी श्रीखंड 100 रुपयांनी महागले आहे. पण त्याच बरोबर बाजारात नेहमीच्या चवीपेक्षा वेगळ्या चवीही उपलब्ध आहेत. मिक्स फ्रूट श्रीखंड आणि मिरचीचे श्रीखंड हे यावेळचे खास वैशिष्ट्य आहे.ठाण्यात महारांगोळीगुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात रंगावली संस्थेने मोठी रांगोळी काढली आहे. 21 स्क्वेअर फूट जागेत ही रांगोळी काढण्यात आली आहे. यात 1 हजार किलो रांगोळी आणि 1200 किलो रंग वापरण्यात आले आहेत. 100 कलाकारांनी सलग 8 तास खपून ही रांगोळी काढली आहे.नाशिकमध्ये फुले महागलीतर नाशिकमध्येही नववर्षाची जोरदार तयारी सुरू आहे. तोरण, साखरेचे हार, मिनी गुढी यांच्यासह झेंडुच्या फुलांनी नाशिक मार्केट फुलले आहे. पाडव्यामुळे झेंडुच्या फुलांचे दर 10 ते 20 रुपयांनी वधारलेत. पाडव्याच्या मुहूर्तावर बाजारात झेंडुच्या फुलांची मोठी आवक होते. पंचांगांनीही मोठी मागणी आहे. दाते, कालनिर्णय, महालक्ष्मी यांचे पंचांग बाजारात आले आहे.

close