सरकारला धनगरांना आरक्षण द्यायचंच नाहीये -धनंजय मुंडे

March 10, 2016 4:55 PM0 commentsViews:

dhanjay_munde3425मुंबई – 10 मार्च : विधान परिषदेमध्ये विरोधकांनी आज (गुरुवारी) धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. सरकारला धनगरांना आरक्षण द्यायचंच नाहीये असा आरोप विधान परिषदेचे विरोधी नेते धनंजय मुंडे यांनी केलाय.

धनगर आरक्षणाबाबत केंद्राकडे दोन पत्रं पाठवली. त्यामध्ये धनगरांना आदिवासी आरक्षण देता येणार नाही असं राज्याने कळवलं आहे अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली. सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नाही असा आरोपही त्यांनी केला. तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेला यासंदर्भात अहवाल तयार करण्याचं काम देण्यात आलंय असं उत्तर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी दिलं. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स संस्थेशी याविषयी उद्याही बैठक आहे असं त्यांनी सांगितलं. धनगर आरक्षणावरून परिषदेत गोंधळ सभागृह 20 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close