दाऊदचा बंगला नको रे बाबा !, बंगला ताब्यात घेण्यास ग्रामस्थांचा नकार

March 10, 2016 5:54 PM0 commentsViews:

रत्नागिरी – 10 मार्च : खेड तालुक्यात मुमके या गावात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा बंगला आहे. मात्र, हा बंगला ताब्यात घ्यायला मुमकेच्या गावकर्‍यांनी असमर्थता दर्शविलीय. त्यामुळे या बंगल्याचं भवितव्य अधांतरीच राहिलंय. दाऊद फरार असल्यापासून त्याच्या हा बंगला रिकामाच आहे.

dawod_banglaमुमके गावातला दाउदचा हा बंगला त्याचं या स्वप्नातील बंगला होता. विश्रांती म्हणून खास मुंबईतून दाऊद आठवड्यातील 2 ते 3 दिवस दाऊद या ठिकाणी येत होता. गुन्हेगारी विश्वाशी संबंध आल्यानंतर मात्र हा बंगला कोल्हापूर आयकर विभागाने सील केला होता. गेले अनेक वर्ष रिकामा असलेला हा बंगलाअलीकडे अवैध धंद्याचे केंद्र बनले होते. या ठिकाणी संशयास्पद हालचाली पोलिसांना आढळून आल्याने मुमके ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन हा बंगला ताब्यात घेण्यासंदर्भात लेखी आदेश दिले होते. परंतु, मोडकळीस आलेल्या या
बंगल्याचा ताबा घेण्यासाठी ग्रामस्थानी विरोध दर्शविल्याने दाऊदच्या स्वप्नातील बंगला असाच जमीनदोस्त होणार की काय ?

दाऊद चा मुमके येथील बंगला ताब्यात घेण्या संदर्भात रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने ग्रामसभा घेऊन बंगला ताब्यात घेण्या संदर्भात लेखी आदेश दिले होते. त्यानंतर ग्रामसभा बोलावण्यात आली. मात्र, या ग्रामसभेला ग्रामस्थ उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे ही सभा कोरम अभावी तहकूब करण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांची बैठक होऊन हा बंगला ताब्यात घेऊ नये असा निर्णय झाला. कारण, मोडकळीस
आलेल्या बंगल्याच्या दुरुस्तीचा खर्च परवडणारा नाही. 10 हजार स्केअर फूट बांधकाम असलेल्या बंगल्याचे काय करायचे ? हा बंगला गावाच्या बाहेर असल्याने काही अनुचित प्रकार घडल्यास किवा बंगला कोसळून दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण ?, म्हणून हा बंगला ताब्यात घेण्यास ग्रामस्थांनी नकार दिला आहे।

दाऊदचा आमचा काही संबंध नाही सरकार जाणे आणि दाऊद जाणे. दाऊदच्या बंगल्याचे सरकारने वाटेल ते करावे अशी प्रतिक्रिया सरपंच अकबर दुदुके यांनी दिली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close