महागाईविरोधात पुण्यात आंदोलन

March 15, 2010 2:59 PM0 commentsViews: 1

15 मार्चवाढत्या महागाईविरोधात पुण्यात अनोखे आंदोलन करून भाजपने सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल करणार्‍या महागाईसाठी काँग्रेस सरकार जबाबदार असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. आणि चक्क काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नावाने ज्वेलर्सचे दुकान उघडले. पण या दुकानात सोन्याच्या दागिन्यांऐवजी चक्क अन्न-धान्यांपासून बनवलेले दागिने विकायला ठेवले. सध्याचे अन्नधान्याचे भाव बघता लवकरच सर्वसामान्यांना महिन्याभराच्या अन्नधान्यासाठी आणि सोन्यासाठी साधारणपणे सारखीच किंमत मोजावी लागेल, असा आरोपही यावेळी पुण्याच्या भाजप आमदार माधुरी मिसाळ यांनी केला. तसेच हीच परिस्थीती आणखी काही दिवस राहिल्यास सामान्यांना सोन्याच्या दुकानात जाऊन अन्नधान्य घ्यावे लागेल, असेही त्या म्हणाल्या.

close