फेसबुकवर बनणार जगातली सर्वात मोठी ‘स्मशानभूमी’

March 10, 2016 6:37 PM0 commentsViews:

10 मार्च : ओळखीच्या पण मृत व्यक्तीकडून जर तुम्हाला नोटीफिकेशन्स येत असतील,तर भारावून जाऊ नका. फेसबुकवर मृत युझर्सच्या प्रोफाईल्स अस्तित्वात असणार्‍या युझर्सपेक्षा जास्त आहेत म्हणून संशोधकांच्या म्हणण्यानुसार सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक हे लवकरच ह्या दशकातील जगातलं सर्वात मोठं वास्तविक स्मशानभूमी होणार आहे.

facebook_likeसोशल मीडियाची सर्वात महत्वाचं माध्यम फेसबुकचे जगभरात सध्या 1.5 बिलीयन युझर्स आहेत. त्यामुळेच मृत युझर्समुळे 2098 पर्यंत जगातलं सगळ्यात मोठं वास्तविक स्मशानभूमी होणार आहे,असं डेलीमेल युनायटेड किंगडमचे संख्याशात्रज्ञ हाशिम सिद्दीकी यांनी अहवालात म्हटलंय.

मृत व्यक्तींचे फेसबुक अकाऊंट कायमचे बंद करण्यापेक्षा त्यांचं स्मरणोत्सव साजरा करण्याचं फेसबुकनं ठरवलंय. तसंच फेसबुकनं मृत युझर्सचे अकाऊंट डिलीट करण्यास नकार देत, फेसबुकच्या अस्तित्वात असणार्‍या युझर्सची संख्या वाढेल असं आश्वासनही दिलंय.

डिजीटल ब्लॉगिंग कंपनीच्या म्हणण्यानुसार, किमान 9,70,000 फेसबुकचे युझर्स दरवर्षी मृत पावतात. 2010 मध्ये 3,85,968 तर 2012 मध्ये 5,80,000 युजर्स मृत पावले. सिद्दीकींनी लवकरच ‘फेसबुक’ विमापॉलिसी राबवणार आहे अशी माहिता दिली. फेसबुकच्या युझर्सने मृत व्यक्तींच्या बर्थडे अलर्टच्या तक्रारी केल्या होत्या.

फेसबुकने लवकरच लिगसी पॉलिसीद्वारे मृत व्यक्तीच्या प्रोफाईलचा अभ्यास करून त्यांच्या शेवटच्या पोस्टवरून आणि पाठवल्या
जाणार्‍या रिक्वेस्टवरून अकाऊंटबद्दल माहिती मिळवणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close