‘एम.एस.धोणी’ सिनेमाचं पोस्टर रिलीज

March 10, 2016 6:49 PM0 commentsViews:

10 मार्च : भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टनकूल महेंद्रसिंग धोणीच्या जीवनावर असलेला ‘एम.एस.धोणी’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वर्षी 2 सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होणार आहे. सुशांत सिंग राजपुत धोणीची भूमिका साकारतोय.

‘बेबी’ सिनेमाचं दिग्दर्शन केलेला नीरज पांड्ये सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. सुशांतने चित्रपटाचा पहिला पोस्टर ट्विटरवर ट्विट केलाय.धोनीच्या संघर्षापासून ते प्रसिद्ध कर्तृत्ववान क्रिकेटर होईपर्यंतचा प्रवास चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.

पोस्टरमध्ये ‘महेंद्रसिंग धोनी’- द मॅन यु नो बट् जर्नी यु डोन्ट(ह्या व्यक्तिला तुम्ही ओळखता पण त्याच्या प्रवासाला नाही) अशी टॅग लाईन आहे. सुशांतने चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतल्याचं पोस्टरमध्ये दिसून येतंय. सुशांत या आधी ‘काई पो चे’ चित्रपटातून दिसला होता.
चित्रपटाच्या सहकलाकारांमध्ये कायरा आडवाणी ही साक्षी धोणीची भूमिका करणार आहे, तर हॅरी तंगेरी हरभजन सिंगच्या भूमिकेत असणार आहे. अनुपम खेर यांनी चित्रपटात विशेष भूमिका बजावल्याचंही म्हटलं जातंय. रिती स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि आदर्श टेलीमीडियाद्वारे चित्रपटाची निर्मिती करण्यात येईल.

धोनीचं जीवनचरित्र असलेल्या ह्या चित्रपटाला क्रिकेटप्रेमीं चांगलाच पाठिंबा देतील,पण सामान्यांच्या मनापर्यंत धोणीचं जीवनचरित्र किती पोहोचतं हे येत्या 2 सप्टेंबरलाच कळेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close