‘धावती लोकल पकडू नका’ सल्ला देणार्‍या तरुणालाच बेदम मारहाण

March 10, 2016 7:03 PM0 commentsViews:

अंबरनाथ – 10 मार्च : ‘धावती लोकल पकडू नका’ असा सल्ला देणार्‍या तरुणाला तो चांगलाच महागात पडला आहे. ज्यांना हा सल्ला दिला त्यांनीच या तरुणाला अर्धनग्न करून मारहाण केलीये.mumbai local accident

बुधवारी कामाला जाण्यासाठी निघालेला दीपक मलिक हा तरुण अंबरनाथ रेल्वे स्थाकावर मुंबईकडे जाणार्‍या लोकलमध्ये चढला. याचवेळेला धावती लोकल पकडण्याचा एक कुटुंब प्रयत्न करत असतांना धावती लोकल पकडू नका असा सल्ला दीपकनं त्यांना
दिला. यावर संतापलेल्या त्या कुटुंबातील काही लोकांनी दीपकला लोकल मधून खाली खेचत अंबरनाथ स्थानकावरच बेदम मारहाण करायला सुरुवात केली. त्याच्या अंगावरील कपडे निघेपर्यंत त्याला अर्धनग्न करून मारहाण करण्यात आली. यावेळी एकही रेल्वे पोलीस त्या ठिकाणी हजर नव्हता. या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close