‘पैसे द्या ,पीएचडी घ्या’, ‘बामू’मध्ये प्राध्यापिकांनी मांडला बाजार !

March 10, 2016 10:53 PM0 commentsViews:

सिद्धार्थ गोदाम,औरंगाबाद – 10 मार्च : महाराष्ट्राचा शिक्षण विभाग भ्रष्टाचारानं कसा पोखरलाय हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही…कोट्यावधीची उलाढाल गैरमार्गानं होते आणि ती सुरूच आहे. औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संशोधन विभागातील काही मार्गदर्शकांनी संशोधनाचा चक्क बाजार मांडलाय.संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना पैश्यासाठी चक्क ब्लॅकमेल केलं जातंय. आणि हे ब्लॅकमेल कुणी लिपीक करत नाही तर चक्क मार्गदर्शन करणारे काही गाड करतायेत.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ…विद्यापीठातल्या काही प्राध्यापकांनी शिक्षणाचा काळा बाजार मांडलाय..पीएचडीसाठी चक्क लाखो रुपयांची मागणी प्राध्यापकांकडून केली जातेय..आयबीएन लोकमतच्या हाती याचे काही पुरावे लागलेत..इंग्रजीत पीएचडी करणार्‍या विद्यार्थ्याला त्याची गाईड असलेल्या प्राध्यापिका गीता पाटील कशी धमकी देतायत बघा..phd3

डॉ.गीता पाटील : “जोपर्यंत तू सांगितलेल्या रक्कमेचा चेक देत नाही…आणि जो पर्यंत तो चेक क्लिंयरन्स होत नाही तोपर्यंत मी तुझ्या थेसिसवर सही करणार नाही…तू काय माझ्याकडं फुकटची पीएचडी करत आहेस काय..बहाणे करू नकोस..मी काय साधी प्राध्यापिका नाही…मी पक्की राजकारणी आहे…”

प्रा. डॉ.गीता पाटील या एका आमदाराच्या जवळच्या समजल्या जातात..त्यांच्याबद्दल तक्रार करूनही विद्यार्थ्याला न्याय मिळत नाही…उलट त्यांनी मजल विद्यार्थ्याला थेसिस फेकून देण्याची धमकी देण्यापर्यंत गेलीय.

डॉ.गीता पाटील, “फेकुन देईन तूझा थेसीस अन कॅन्सल करते…तू काय माझा विद्यार्थी नाहीस…आत्ताच सांगायला लागले मी..तुम्ही लोक काय माझ्या कामाला आलेले आहात काय…मी तुमच्या कामाला यायला…तुमचे संबंध असतील तिकडे सांगायचे काय असेल ते..माझ्याकडं यायचं नाही….”

आता समाजकार्य विषयात पीएचडी करणार्‍या विद्यार्थीनीची व्यथा..जालन्याच्या प्राध्यापिका डॉ.रेणुका बडवणे भावसार यांनी तिला प्रोग्रेस रिपोर्ट देण्यासाठी चक्क दीड लाख रुपयांची मागणी केली.

विद्यार्थिनी : “मॅडम दीड लाख रूपये जास्त होतात..गुरू दक्षिणा म्हणून काही तरी देईल तुम्हाला..मात्र दीड लाख रूपये मी देवू शकत नाही…मी आईला बोलले आई म्हणाली एवढे पैसे आपण देवू शकत नाही…”

प्रा.रेणुका बडवणे : “अगं..मी तुला खूप कमी सांगितले…बाहेर खूप जास्त घेतात…तू दीड लाख रूपये द्यायला तयार आहेस तर भेटू नाही तर मग तू दुसरा गाईड बघ…”

विद्यार्थ्यांना ब्लॅकमेल करणार्‍या या प्राध्यापिकांच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी कुलगुरू आणि प्रशासनाकडे केल्या..तेही पुराव्यासहीत… पण कारवाई न करता उलट विद्यार्थ्यांनाच गाईड बदलून घेण्याचा अजब सल्ला दिला गेला. भ्रष्ट आणि ब्लॅकमेलर प्राध्यापिकांना काही राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्यानं विद्यापीठ त्यांच्यावर कारवाईला घाबरत असल्याचं बोललं जातंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close