अण्णांचे उपोषण सुरू

March 16, 2010 9:40 AM0 commentsViews: 6

15 मार्च ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी राळेगणसिद्धीच्या यादवबाबा मंदिरात बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. सरकारने पतसंस्था आणि ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत, दारुचे धोरण ठरवावे आणि दालनांवरील खर्च संबंधित मंत्र्यांकडून वसूल करावा या मागण्यांसाठी त्यांनी हे उपोषण सुरू केले आहे. या मागण्यांवर निर्णय घेतल्यानंतरच हे उपोषण मागे घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. राज्यभर हे आंदोलन करण्यात येत आहे.

close