लातूर शहराला कडेकोट पोलीस बंदोबस्तात डोंगरगावचं पाणी

March 11, 2016 12:32 PM0 commentsViews:

£ÖÖêæÆüÖßÖ

लातूर– 11 मार्च : दुष्काळाच्या झळांमुळे महाराष्ट्राच्या गावागावांमधल्या लोकांचं जगणं कठीण बनलं आहे. घोटभर पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू आहे. राज्यात पाणीटंचाईचं संकट किती भीषण होत चाललं आहे, हे दाखवणारी परिस्थिती सध्या लातूरमध्ये आहे. लातूरमध्ये पोलीस बंदोबस्तात टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

लातूर शहरात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. यावर उपाय म्हणून डोंगरगाव इथल्या बंधार्‍यातून लातूरला पाणी देण्यात येणार होतं. मात्र डोंगरगाव परिसरातील गावांनी लातूरला पाणी देण्यास विरोध केला. दोन दिवस शहराला पाणी आणण्यात प्रशासनाला त्रासाला समोरं जावं लागलं. यावर कोणताच तोडगा निघत नव्हता. अखेर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार काल (गुरूवारी) पोलीस बंदोबस्तात 25 टँकरनं लातूरला पाणी पुरवठा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्यानं गावकर्‍यांचा विरोध मात्र मावळला. आता डोंगरगाव बंधार्‍यातून लातूरला पाणी देण्यासाठी तब्बल 11 गावांचा विरोध झुंगारून कडेकोट पोलीस बंदोबस्तात डोंगरगावचे पाणी टँकरद्वारे आणण्यास सुरूवात झाली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी निधीची घोषणा केली असली तरी पाणीसंकट दूर झालं झालं नाही. एप्रिल महिन्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close