राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा – शशांक राव

March 11, 2016 2:03 PM0 commentsViews:

sdasdasay
मुंबई – 11 मार्च : नवीन रिक्षा रस्त्यावर दिसल्यास त्या जाळून टाका, असं वक्तव्य करणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी ऑटोमेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी केली आहे.

अंधेरी परीसरातल्या आरटीओ कार्यालयासमोर उभी असलेली रिक्षा काल (गुरूवारी) रात्री अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिली होती. तिथे मनसेचा झेंडा सापडल्याने यामध्ये पक्षाचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शशांक राव यांनी केली आहे.

या पार्श्वभूमीवर शशांक राव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रिक्षाचालकांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करणार असल्याचंही म्हटलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close