मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर गिरणी कामगारांचं आंदोलन स्थगित

March 11, 2016 4:48 PM0 commentsViews:

 
मुंबई – 11 मार्च : आझाद मैदानावर सुरू असलेलं गिरणी कामागारांचं आंदोलन स्थगित झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर गिरणी कामगारांनी आंदोलन मागे घेतलं आहे. गिरणी कामगारांच्या घरांच्या किंमतीबाबत 15 दिवसांमध्ये निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे.girani_kamgar2

गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित मागण्यासाठी आज पुन्हा एकदा गिरणी कामगार रस्त्यावर उतरले. आझाद मैदानावर राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी कऱण्यात आलीये. राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे आंदोलक अधिक आक्रमक झाले आणि जेलभरो आंदोलनाची तयारी सुरू केली. या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. गिरणी कामगारांना देण्यात येणार्‍या घरां़च्या किंमती ठरवण्यासाठी 15 दिवसात बैठक बोलावण्यात येईल आणि घरांसाठी लॉटरी राज्य सरकार काढेल असं मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केलं . त्यानंतर गिरणी कामगारांनी आपलं आंदोलन तुर्तास स्थगित केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close