5 कोटींचा दंड 3 आठवड्यात भरा, ‘एनजीटी’चं ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ला फर्मान

March 11, 2016 5:01 PM0 commentsViews:

shri_shri3213नवी दिल्ली – 11 मार्च : आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांच्या विश्वशांती महोत्सवाला आज सुरुवात झालीये. पण दंड भरण्यास नकार देणार्‍या श्रीश्रींचा पाठलाग राष्ट्रीय हरित लवादाने अजून सोडलेला नाही. आर्ट ऑफ लिव्हिंगला 3 आठवड्यात 5 कोटींचा दंड भरायला राष्ट्रीय हरित लवादाने फर्मावलंय.

यमुना नदीच्या काठी होणार्‍या आणि पर्यावरणाच्या मुद्द्यावरून वादात सापडलेल्या विश्व संस्कृती महोत्सवाला राष्ट्रीय हरित लवादानं काल परवानगी दिली. मात्र, महोत्सवामुळे होणार्‍या जलप्रदुषणाची भरपाई म्हणून त्यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन’ला तब्बल 5 कोटींचा दंडही ठोठावला. त्यामुळे आज आर्ट ऑफ लिव्हिंगने येवढी मोठी रक्कम भरण्यासाठी हरित लवादाकडे वेळ मागितला आहे. हरित लवादाने दंडाची रक्कम भरण्यासाठी आजपर्यंत वेळ दिला होता. पण 5 कोटींचा दंड एवढ्या कमी वेळात भरण्यासाठी श्री श्री रवीशंकर यांनी असमर्थता दाखवली होती. या महोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. मात्र, या वादाच्या पार्श्वभूमीवर ते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close