डान्सबार असोसिएशनकडून जलयुक्त शिवारला कोणताही निधी मिळाला नाही -मुख्यमंत्री

March 11, 2016 5:59 PM0 commentsViews:

11 मार्च : अधिवेशनादरम्यान विधानपरिषदेत जलयुक्त शिवार योजनेच्या चेक्सचा मुद्दा प्रश्नोत्तरांच्या तासात ऐरणीवर आला. विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी डान्सबार असोसिएशनकडून 30 लाखांचा चेक मिळाला हे खरं आहे का ? असा सवाल उपस्थित केल्यामुळे खळबळ उडाली. मात्र, डान्सबार असोसिएशनकडून असा कोणताही चेक मिळाला नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.cm_on_jalyukta

राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेसाठी किती निधी आला किती चेक्स मिळाले अशी विचारणा विधासभेत करण्यात आलीये.
या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना दिलेले चेक्स न वटल्याबद्‌दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली. जलयुक्त शिवार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी जलयुक्त शिवारसाठी एकूण 10, 373 चेक मिळाले यातून 90 कोटी रूपये जमा झाले. यापैकी 28 चेक वटले नाहीत. हे 28 धनादेश स्टेट बँक ऑफ इंडियाकडून परत आले आहेत.

याची किंमत 10 लाख 36 हजार रूपये होती. यापैकी 3 लोकांनी चेक परत दिले ते सुमारे 5 लाख रूपयांचे आहे. सही न जुळणे, जुने चेक पाठवणे, काही सहया जुळल्या नाहीत असे चेक वटले नाहीत असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला. तसंच यामध्ये कोणीही भाजप कार्यकर्ता नाही. जे चेक वटले नाहीत ते परत गेले आणि त्यांना नोटिस पाठवण्यात आल्या आहे. अनेकांनी परत नव्याने चेक दिले आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर डान्स बार असोसिएशनच्या वतीने 30 लाख रूपये निधी मिळाला हे खरं आहे का ? असा थेट प्रश्न धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय. यावर असा कोणताही चेक डान्स बार असोसिएशनकडून मिळालेला नाही असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close