अनधिकृत बांधकामं होणार अधिकृत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

March 11, 2016 7:38 PM0 commentsViews:

cm_on_inligals_work11 मार्च : राज्यात अनधिकृत बांधकामं नियमित करण्याचं धोरण आज (शुक्रवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात जाहीर केलंय. 31 डिसेंबर 2015 पर्यंतची अतिक्रणं काही अटींच्या आधारावर नियमित करण्यात आली आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यानी दिलीय.

विकसीत ले आऊटमधील बांधकाम ज्यांना डीसीआरमध्ये सूट देता यईल त्यांना सूट दिली जाईल, पण प्राधिकरणाच्या जागेवरच्या अतिक्रमण प्राधिकरणाला विचारल्याशिवाय नियमित करण्यात येणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. त्याच बरोबर प्रतिबंधीत क्षेत्रावरील अतिक्रमित बांधकामाला नियमित करण्यात येणार नाही. दिघा, पिंपरी चिंचवडसाठी ही समिती गठीत केली होती. त्या समितीचा अहवाल सर्व राज्यासाठी लागू करण्यात आलंय.

सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील पिंपरी चिंचवड, दिघ्यासहीत जवळपास अडीच लाख बांधकामांना फायदा मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाची घोषणा केल्यामुळे ठाणेकर नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ठाण्यातील अनधिकृत इमारती अधिकृत होत असतांना ठाण्यात नुकतेच झालेलं रस्तारुंदीकरण तसंच गावठाण आणि कोळीवाडा यांच्याकडे देखील सरकारने लक्ष दिले पाहिजं. त्यांच्याकरिता देखील काही तरी योजना राबविल्या पाहिजे अशी मागणी ठाणेकरांनी केली आहे. तसंच ठाण्यातील विरोधी पक्षातील नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांचा निर्णयाच स्वागत करून नाममात्र दर आकारण्याची मागणी केली आहे.

तर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि सामान्य नागरिकांनी मोठा जल्लोष साजरा केला. पिंपरी चिंचवड़ शहरात सुमारे दीड लाख पेक्षा अधिक अनधिकृत बांधकामं उभारल्या गेली आहेत. या बांधकामाच्या मुद्द्यावरुन अनेक वेळा हिंसक आंदोलन झाली होती. मात्र, अखेर 8 वर्षांनंतर आज मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर या शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, असं असलं तरी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेवर उच्च न्यायालय काय आदेश देते हे बघणं गरजेचं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close