इस्रोच्या सेंटरबाहेर गोळीबार

March 16, 2010 10:02 AM0 commentsViews: 6

15 मार्चकर्नाटकात आज उगादी म्हणजेच नव्या वर्षाचे स्वागत होत असताना, बंगुळुरूजवळ इस्रोच्या सेंटरबाहेर गोळीबार झाला आहे. अतिशय कडक सुरक्षा असलेल्या इस्रोच्या सेंटरजवळ 2 अज्ञात लोकांनी गोळीबार करून पलायन केले. इस्रोच्या सेंटरच्या बाहेर असलेल्या सुरक्षा रक्षकांवर या अज्ञांतानी गोळीबार केला. त्यानंतर हा भाग मोकळा करण्यात आला. इस्रोची सुरक्षा व्यवस्था मोडण्याचा हल्लेखोरांनी प्रयत्न केला, अशी माहिती इस्रोचे प्रवक्ते पी. सतीश यांनी दिली आहे. पण हा अतिरेकी हल्ला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

close