IBN लोकमतचा दणका, पीएचडीचा काळबाजार मांडणार्‍या प्राध्यापिकेची गाईडशीप रद्द

March 11, 2016 8:28 PM0 commentsViews:

renukar_badvane3औरंगाबाद – 11 मार्च : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये पीएचडीचा बाजार मांडणार्‍या प्राध्यापिकांचा पर्दाफाश आयबीएन लोकमतने केला होता. या प्रकरणाची दखल घेत प्राध्यापिका रेणुका बडवणे-भावसार यांची गाईडशीप रद्द करण्यात आली आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पीएचडीचा कसा काळाबाजार सुरू आहे याचा पर्दाफाश आयबीएन लोकमतने केला होता. आज त्याचा सकारात्मक परिणाम समोर आलाय. पीएचडीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आवश्यक असतो. पण, विद्यार्थ्यांना दोन प्राध्यापिका ब्लॅकमेल करत असल्याचं, त्यांच्याकडून पैसे मागत असल्याचं आम्ही उघड केलं.

आता या प्रकरणात प्राध्यापिका रेणुका बडवणे-भावसार यांची गाईडशीप रद्द करण्यात आली आहे. त्यांच्या अधिक चौकशीसाठी एक 3 सदस्यांची समितीही नेमण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर पुढची कारवाई केली जाईल असं बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरु बी.ए. चोपडा यांनी सांगितलं. दरम्यान, याच प्रकरणातल्या आणखी प्राध्यापिका गीता पाटील यांच्यावरही कारवाई होणं महत्त्वाचं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close